*निसर्गकवी पद्मश्री ना.धो.महानोर यांचे निधन :*
अमळनेर प्रतिनिधी :- बापूराव ठाकरे.
जळगाव जिल्ह्याचे भूषण निसर्ग कवी पद्मश्री ना.धो.महानोर यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी पुण्यातील रुबी हॉल येथे अखेरचा श्वास घेतला गेल्या अनेक दिवसांपासून पुणे येथे किडनी आजारावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. जैत रे जैत, सर्जा, एक होता विदूषक या प्रसिद्ध चित्रपटासह अनेक चित्रपटासाठी त्यांनी गीत रचना केली होती. वि. दा. करंदीकर *”जीवन गौरव” पुरस्काराने तसेच मानाचा “पद्मश्री” पुरस्काराने एबीपी माझाचा “माझा सन्मान” पुरस्काराने ते सन्मानित होते*. या नभाने या भुईला दान द्यावे, मी रात टाकली-मी कात टाकली हे गीते फार प्रसिद्ध झाली होती. त्यांच्या शब्दातून अक्षरशः निसर्गच बोलायचा शेतीमध्ये रमणारा या कवीने शेती विषयावर विपुल लेखन केले आहे शेती विषयावर त्यांचे भरपूर व्याख्याने शेतकरी वर्गासाठी उपयुक्त ठरलेली आहे साधी राहणी उच्च विचारसरणी असलेल्या महानोर यांनी कायम शेती व निसर्गावर प्रेम केले आहे त्यांचा सहवास कायम बोलका असायचा. त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्र व्याकुळ झाले आहे.