अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
आय.एस.ओ. मानांकन प्राप्त
“मराठी लाईव्ह न्युज” या वेब पोर्टलने राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींना अचूक, वेगवान आणि यथोचित प्रसिद्धी देत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
आपण सर्व या प्रवासाचे साक्षीदार आहात आपला विश्वासच आमची खरी ताकद आहे.
आमच्या या प्रवासाला सहा वर्षे पूर्ण होत आहेत.
त्या निमित्ताने रविवार, दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता, जुना टाऊन हॉल (साने गुरुजी वाचनालय समोर), अमळनेर येथे
“सहावा वर्धापन दिन व सन्मान कर्तुत्वाचा 2025” हा भव्य सोहळा आयोजित केला आहे.
या प्रसंगी शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, प्रशासकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून
11 दिग्गज व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या सोहळ्याला आपल्या सर्व वाचक, जाहिरातदार, मित्रपरिवार, मार्गदर्शक बंधू-भगिनींनी
उपस्थित राहून आमच्या या आनंदसोहळ्याला शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वाद द्यावेत,
हीच आमची मनःपूर्वक विनंती.
नेहमीच आपल्या सेवेत,
ईश्वर आर. महाजन
अमळनेर
मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क, महाराष्ट्र राज्य



