क्रांतीज्योती सावित्रीबाईंना अभिवादन.युवा कल्याण प्रतिष्ठान,अमळनेर तर्फे १०० व्याख्यानांचा उपक्रम.

अमळनेर प्रतिनिधी – रयत संदेश न्यूज नेटवर्क

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक ज्योत आणि ती म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत आणि स्त्री स्वातंत्र्याच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान ने शंभर महिलांच्या व्याख्यानाने सावित्रीबाईंना अभिवादन केले. अमळनेर शहर व तालुक्यातील सुमारे 25000 विद्यार्थ्यांपर्यंत सावित्रीबाई फुलेंचा जीवनपट महिला वक्त्यांनी आपल्या भाषणातून सांगितला. अमळनेर शहरातील 22 हायस्कूल ग्रामीण भागातील 52 हायस्कूल तर शहरातील 6 मराठी शाळा व ग्रामीण भागातील 20 मराठी शाळा, शिवाय शासकीय आश्रम शाळा सर्व मिळून 100 शाळांमध्ये जाऊन महिला वक्त्यांनी सावित्रीबाईंच्या कर्तृत्व विषयी माहिती सांगितली. महिला वक्त्यान मध्ये गृहिणी,शिक्षिका, प्राध्यापिका सामाजिक कार्यकर्त्या सेवानिवृत्त शिक्षिका शेतकरी महिला इत्यादींचा समावेश होता.

संयुक्त राष्ट्र संघाने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष म्हणून जाहीर केले आहे, त्या पार्श्वभूमीवर या अभियानात शेतकऱ्यांच्या मुलींनी शिक्षण तज्ञ सावित्रीबाईं च्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. या अभिनव अभियानाच्या प्रमुख गायत्री भदाणे (मा मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले विद्यालय अमळनेर )या होत्या. त्यांनी 104 महिलांशी संपर्क साधून व्याख्यान द्यायला प्रवृत्त केले.

3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपूर्वी महिला वक्त्यांची कार्यशाळा विठ्ठल नगर येथील अभ्यासिकेत घेण्यात आली होती. या कार्यशाळेला सुमारे 50 महिला भगिनी उपस्थित होत्या या कार्यशाळेला गायत्री भदाणे,श्रद्धा रेखा राजेंद्र, प्रा डॉ लीलाधर पाटील यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांचे कार्याविषयी चे वाचन साहित्य सर्व महिला वक्त्यांना निशुल्क देण्यात आले.

महापुरुषावरील व्याख्यानांच्या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमासाठी कोणाकडूनही अनुदान मिळत नाही. निधीही गोळा केला जात नाही अत्यंल्प खर्चात हजारो विद्यार्थ्यांपर्यंत महापुरुषांचे विचार पोहोचतात. हे अभियान गेल्या चार वर्षापासून नियमित सुरू आहे या अभियानातील वक्ते कोणतेही मानधन प्रवास खर्च घेत नाहीत दिलेल्या वेळेवर व्याख्याने होतात या कामी प्राथमिक माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे व शिक्षण विभागाचे त्यांच्या अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभते प्रथमच 100 भक्तांच्या व्याख्यानाचे आयोजन युवा कल्याण प्रतिष्ठानने केले होते यासाठी नारीशक्तीने खूप चांगला प्रतिसाद दिला व प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थ्यांची मने जिंकली असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा अशोक पवार यांनी सांगितले हे अभियान यशस्वी करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रा डॉ लीलाधर पाटील, डॉ.बापूराव ठाकरे, डी. ए.पाटील,संजय पाटील सोपान भवरे सर्व केंद्रप्रमुख गिरीश पाटील योगेश पाटील डॉ. कुणाल पवार इत्यादींची मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page