पी.आर.के. प्रतिष्ठानतर्फे रविवारी संगमनेर येथे राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा 

संगमनेर  प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

पी.आर.के. प्रतिष्ठान, संगमनेर,जि. अहमदनगर यांच्या वतीने राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा – २०२६ रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम के. बी. दादा देशमुख सभागृह, सह्याद्री महाविद्यालय, संगमनेर येथे संपन्न होणार आहे.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक पदवीधर संघांचे माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे असणार आहेत. तसेच कार्यक्रमास माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.

 

यावेळी संत साहित्याचे अभ्यासक व देहूचे माजी सरपंच मा. श्री. महादेव कंद, मा. डॉ. जयश्रीताई थोरात , मा. श्री. इंद्रजीतभाऊ थोरात, मा. सौ. दुर्गाताई तांबे ,शंकर पाटील खेमनर , मा. श्री. अजय दादा फटांगरे,मा. श्री. निरज सिद्धार्थ मुकुंदे, तुषारभाऊ शिंदे, मा. श्री. चंद्रकांत घुले , मा. अ‍ॅड. अशोक हजारे , संजय क्षीरसागर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

तसेच नाशिक पदवीधर मतदार संघांचे आमदार सत्यजित तांबे,अमळनेर शिक्षक प्रसारक मंडळाचे सचिव संदीपजी घोरपडे, राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजाभाऊ कांबळकर , मा. श्री. सिताराम राऊत , राजाभाऊ अवसक, जयरामभाऊ ढेंरंगे, उद्योजक गगन थोरात, किरणभाऊ रोहम, बाबासाहेब भोसले,अमोल भाऊ गुंजाळ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

 

समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या राज्यस्तरीय सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.बुलढाणा येथील ग्रामगिता प्रचार आणि प्रसारक सुधाकर पाटील यांना वारकरी रत्न, शिरूर येथील विजय महाराज भोईरकर यांना वारकरी भूषण,अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांना मा. ना. बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता पुरस्कार तर अभिनेते व शिवप्रबोधनकर डॉ. सागर फापाळे यांना डॉ. सुधीरजी तांबे धन्वंतरी पुरस्कार यासोबत राज्यभरातून विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात येत आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे अवाहन कार्यक्रमाचे समन्वयक संदीप काकड,गिरीश काकड,अंतोन मिसाळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page