अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क
जळगाव येथील रिंग रोड परिसरातील रहिवाशी जन क्रांती मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकुंदभाऊ सपकाळे हे नेहमी सेवा भावी वृत्तीने सामाजिक कार्य करत असतात गोरगरीब जनतेसाठी नेहमीच मेहनत घेतात अशा माणुसकी असलेल्या व्यक्ती वर भर दिवसा प्राण घातक हल्ला झाला. दिनांक. 11/4/2026 रोजी दुचाकीवरून हल्लेखोर आले आणि त्यांनी मुकुंद भाऊंवर जिवघेणा हल्ला केला आणि त्यांच्या दगडफेकीत गाडीची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात आणि जळगांव शहरात भितीचे वातावरण पसरले आहे . कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हल्लेखोर यांना अटक करण्यात यावी आणि कठोर कारवाई करावी यासाठी अमळनेर येथे सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले निवेदनात घटनेतील मुख्य आरोपी व त्यांच्या साथीदारांना तात्काळ अटक करावी , भारतीय दंड संहिता अंतर्गत खुन करण्याच्या प्रयत्न(कलम 307)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा याप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करावी , अशा घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या असे नमूद केले आहे प्रांताधिकारी कार्यालयात यावेळी प्रा. अशोक पवार सर, गौतमदादा मोरे, प्रा.सुभाष पाटील, बन्सीलाल भागवत, अशोक बिऱ्हाडे, बाळासाहेब संदानशिव, अतुल डोळस, हदयनाथ मोरे, पुरुषोत्तम माळी, महादू बैसाणे, अरूण देशमुख, चंद्रकांत बिऱ्हाडे, आत्माराम अहिरे, समाधान मैराळे पत्रकार इ. उपस्थित होते.




