साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये श्री संदीप घोरपडे सरांचा आदर्श लोकनेता पुरस्कार मिळाला त्याबद्दल व श्री विलास चौधरी सरांचा 58 वा वाढदिवस निमित्त जाहीर सत्कार .*

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

दिनांक १० ३ २०२६ वार मंगळवार रोजी साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये संस्थेचे सचिव माननीय श्री दादासाहेब संदीप घोरपडे यांना पी .आर .के . प्रतिष्ठान संगमनेर यांच्या वतीने माननीय बाळासाहेब थोरात आदर्श लोकनेता पुरस्कार दिनांक.    ८ / ३/ २०२६ वार – रविवार रोजी सकाळी साडेदहा वाजता दिला गेला . त्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता . सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक माननीय श्री मगन भाऊसाहेब हे अध्यक्षस्थानी होते . सत्कार मूर्ती म्हणून माननीय श्री दादासाहेब संदीप घोरपडे व श्री विलास चौधरी ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब श्री .गुणवंतराव पाटील संस्थेचे अध्यक्ष श्री हेमकांत पाटील . व संचालक श्री .किरण पाटील .व जेष्ठ संचालक श्री . एस् . जे शेख .व मुख्याध्यापक श्री सुनील पाटील . ज्येष्ठ शिक्षक श्री जे . एस् .पाटील व शिक्षक वृंद आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते . मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी असल्याने त्यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन केले . साने गुरुजी व संस्थापक कै .बापूसाहेब गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सत्कारमूर्ती श्री . दादासाहेब संदीप घोरपडे व श्री . विलास चौधरी .या दोघा मान्यवरांचा सत्कार केला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री . जे . एस् .पाटील . सर यांनी केले सत्काराला उत्तर देताना श्री . दादासाहेब घोरपडे सर यांनी म्हटले की हा सत्कार माझ्या केलेल्या कार्याची पावती आहे .मी धन्य आहे की मला एक चांगला पुरस्कार मिळाला .मला हा पुरस्कार अजून चांगले काम करण्याची प्रेरणा देईल .तसेच जरी चौधरी सर ह्या महिन्यात सेवानिवृत्ती होत असले तरी त्यांची कार्याची पावती म्हणून आम्ही संस्था चालक त्यांना संचालक पदी नियुक्ती करणार आहोत . चौधरी सर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की मी साने गुरुजी कन्या हायस्कूल व साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय या दोन्ही शाळांमध्ये नोकरी केली . विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल याचा ध्यास आयुष्यभर ठेवला .व पुढेही ठेवत राहील . मुख्याध्यापक . श्री सुनील पाटील सर यांनी आपल्या मनोगतात दोघं सत्कारमूर्तींचा कार्याचागौरव केला . विद्यार्थिनीं मधून नववी ब च्या रेणुका लाड व श्रावणी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले . अध्यक्षीय भाषणा माननीय श्री मगन भाऊसाहेब यांनी दोन्ही शिक्षकांचा कार्याचा गौरव केला .व घोरपडे सरांना त्यांची कार्याची पावती म्हणून आदर्श लोकनेता पुरस्कार मिळाला . सूत्रसंचालन श्री दीपक महाजन व आभार श्री दिलीप पाटील .सर यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page