अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क
मारवड येथील कै . न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.वसंत श्रावण देसले यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे भारताच्या जडणघडणीतील योगदान यावर सखोल मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. डॉ. माधव वाघमारे यांनी केले तर आभार प्रो. डॉ. दिलीप कदम यांनी मानले सदरील कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी ,उपस्थित होते




