सोलापुरातील जेष्ठ नागरीक हाजी के. बी. नदाफ यांच्या हस्ते डॉ. रविंद्र चिंचोलकर यांचा सन्मान.

सोलापूर तालुका प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

सोलापूर शहरांत शिक्षण, सहकार आणि उद्योग क्षेत्रांत योगदान देत असलेले फर्निचर विश्वातील नामवंत उद्योजक आणि जेष्ठ अभ्यासू नागरिक हाजी के. बी. नदाफ यांनी डॉ. रविंद्र चिंचोलकर यांच्यासोबत आवर्जून संवाद साधत त्यांच्या आज पर्यंतच्या शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता आणि जनसंपर्क इत्यादी क्षेत्रातील कार्याचा आढावा जाणून घेऊन त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना शाल अर्पण करून त्यांचा विशेष सन्मान केला.

 

सोलापूरच्या फर्निचर विश्वात गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देत असलेले के. बी. नदाफ अँड सन्स या फर्निचर मॉल उद्योगाचे प्रमुख, सोलापूरच्या मंजरेवाडी परिसरात शिक्षण क्षेत्रांत सेवा देत असलेल्या गैबी पीर उर्दू हायस्कुलचे चेअरमन, आणि सहकार क्षेत्रांत कार्यरत असणारी नदाफ नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर या सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री हाजी के. बी. नदाफ यांनी डॉ. रविंद्र चिंचोलकर यांच्यासोबत सद्य सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्तिथी, पत्रकारिता आणि त्यामध्यें असणारी माध्यमांची भुमिका ईत्यादी विषयक विविध विषयांवर दिलखुलास वार्तालाप केला.

तसेंच डॉ. रवींद्र चिंचोलकर लिखित “राजकारण आणि पत्रकारिता” या पुस्तकाचे महत्व लक्षांत घेऊन स्वतःला वाचण्यासाठी तसेंच ही महत्वपुर्ण माहिती इतरांना ही माहीती व्हावी या उद्देशाने हे पुस्तकं इतरांना सदिच्छा भेट देण्यासाठी म्हणुन या पुस्तकाच्या १० प्रती आवर्जुन मागवून घेतल्या.

यावेळीं दैनिक लोकप्रधान न्यूज नेटवर्क चॅनेल चे उपसंपादक तौफिक नदाफ हे ही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page