जैन सोशल ग्रुप, अमळनेरची 13 वी इंस्टॉलेशन सेरेमनी उत्साहात संपन्न.

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क.

जैन सोशल गृप अमळनेर द्वारा वर्ष 2026–2027 साठीची 13 वी इंस्टॉलेशन सेरेमनी नुकतीच रोटरी हॉल पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल येथे दि. 10/05/2026 रोजी उत्साहात संपन्न झाली.

कार्यक्रमाची सुरुवात सौ. पूजा पारख व सौ. रिना पारख यांनी णमोकार महामंत्राचे भावपूर्ण सादरीकरण केले.त्यानंतर कु. आरोही भूपेंद्र जैन हिने गणेश वंदना भाव सहित सादर केली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. रूपाली कोठारी व सौ. वृषाली पारख यांनी केले.

यावेळी मावळते अध्यक्ष सौरभ छाजेड व सचिव प्रितेश जैन यांनीआपल्या कार्यकाळाचा आढावा घेत पुढील वर्षाची धुरा नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन एस पारख, सचिव महावीर सिंघवी व त्यांच्या BOD टीमकडे सुपूर्त केली.

शपथविधी समारंभाचे संचालन इंस्टॉलिंग ऑफिसर सचिन ऐन शाह (सचिव – MaRC) यांनी केले. हा शपथविधी मुख्य अतिथी सचिन बी शाह इंटरनॅशनल डायरेक्टर– JSGIF), विशिष्ट अतिथी सचिनजी एस. कपाड़िया,(Zone Co-Ordinator, C’S Nagar, Malegaon) तसेच फाउंडर अध्यक्ष प्रदीप पारख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमाच्या पुढील सत्रात नवीन सदस्यांची पिन सेरेमनी पार पडली. तसेच महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित सर्व माता-भगिनींचा सन्मान करण्यात आला. यावेळी सौ. आशाजी महेंद्रजी छाजेड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मोलाचे मार्गदर्शन करत नव्या कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात नवनिर्वाचित अध्यक्षांनी येणाऱ्या वर्षात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. त्यामध्ये विशेषतः गौशाळेत जीवदया प्रोजेक्ट, मेडिकल कॅम्प, जैन प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट, विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा तसेच महिलांसाठी विविध व्यवसायिक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास जैन समाजातील विविध संस्थांचे अध्यक्ष, भारतीय जैन संघटनाचे पदाधिकारी, खान्देश शिक्षण मंडळाचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, रोटरी क्लब व लायन्स क्लब चे सदस्य, पत्रकार बंधू तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी JSG सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे पी.आर.ओ. श्री.किर्ती कुमार कोठारी यांनी केले तर नवनिर्वाचित सचिव श्री.महावीर सिंघवी यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page