खेडी सीम(प्र.ज.) येथील नवनियुक्त पोलीस पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

खेडी सीम(प्र.ज.) येथील नवनियुक्त पोलीस पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न….

पो.पा. समाधान पाटील यांनी मिळवला जिल्ह्यातुन प्रथम येण्याचा मान….

अमळनेर-रयतसंदेश न्युज :-
तालुक्यातील खेडी सीम(प्र.ज) येथील पोलीस पाटील समाधान पाटील यांचा गृप ग्राम पंचायत, जनसुराज्य ग्रामविकास मंडळ, राजमुद्रा अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समितीचे मा. सभापती शाम अहिरे अध्यक्ष म्हणून विराजमान होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे,भाजप अमळनेर उपतालुकाध्यक्ष महेंद्र पाटील खेडीच्या प्रथम नागरिक आशाताई ज्ञानदेव पाटील, उपसरपंच शोभा पाटील मंचावर उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसुराज्य ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष व पंचायत सदस्य प्रा.ज्ञानदेव पाटील यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात द्विपप्रज्वलनाने करण्यात आली
आलेल्या सर्व मान्यवरांचे कार्यक्रमाप्रसंगी स्वागत करण्यात आले. सर्वं संस्थेचे पदाधिकारी, पंचायत सरपंच, सदस्य, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मान्यवरांच्या हस्ते पोलीस पाटील समाधान पाटील यांचा भव्य सत्कार करून गौरविण्यात आले
पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी आपल्या मनोगतातून “तालुक्यातील गुन्हेगारी बऱ्यापैकी संपुष्टात आली आहे आता लक्ष आहे ते दारूबंदी वर यासाठी पोलिस पाटीलांचे सहकार्य मला आवश्यक आहे.दारूमुळे अनेक कुटुंब बरबाद झाली आहेत अनेक लोक मृत्यू झाले आहेत हे थांबवायचे आहे” असे प्रतिपादन केले. सर्वाना समान न्याय देण्याचे काम मी करणार आहे.पोलीस अधिनियमानुसार कोणावरही आकस बुद्धीने अगर जळलीक असलेल्या लोकांच्या सांगण्यावरून मी कार्य करणार नसून मी शुद्ध बुद्धीने कार्य करेन असे सत्काराला उत्तर देताना समाधान पाटील यांनी सांगितले
समाधान पाटील हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पोलीस पाटील च्या परीक्षेत शंभर पैकी 88 टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यशवंतराव पाटील,किसनराव पाटील,बळवंत पाटील, विलास शिंदे,तानाजी पाटील, गुलाबराव पाटील, नागो चव्हाण, सुनील पाटील, राजेंद्र पवार, अनिल माधवराव पवार,गोपाळ शिंदे, अनिल पाटील,विशाल वारुळे, भावेश पाटील,मयूर पाटील, स्वामी पाटील, सारंग पाटील, नरेंद्र पाटील,किरण पाटील,चंद्रकांत पाटील वाल्मीक पाटील यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन किरण चव्हाण यांनी केले. तर आभार प्रा.जिजाबराव पाटील यांनी मानले

You cannot copy content of this page