*महात्मा जोतीराव फुले प्रेमीं कडून अमळनेर येथे मनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन*
अमळनेर प्रतिनिधी :- बापूराव ठाकरे.
राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या विषयी, मनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे) यांनी अमरावती येथील सभेत बोलताना अत्यंत हिन पध्दतीचे वक्तव्य करून समस्त फुले प्रेमीच्या भावना दुखावल्याने अ.भा.महात्मा फुले समता परिषद, क्षत्रिय काच माळी समाज अमळनेर, माळी महासंघ,संभाजी ब्रिगेड,समता युवा कल्याण संस्था, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ,व समस्त फुले,शाहु.आंबेडकर वादी नागरिकांनी संभाजी भिडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून,मा,उप विभागीय अधिकारी,मा, तहसीलदार सो.यांच्या संभाजी भिडे यांच्या वर कार्यवाही होऊन गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले.