शेठ ला. ना.सा.विद्यालयात इ.5 वी ते 9 वी चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

*जळगांव प्रतिनिधी – रयत संदेश न्यूज नेटवर्क*

जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत शालेय वर्षात विविध विषयात /वर्गात गुणवत्ता प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख अतिथी तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.श्री.सुशील दादा अत्रे, ज्येष्ठ संचालक प्रा.शरदचंद्र छापेकर, श्रीमती रजनी पाठक ,डॉ. सौ विशाखा गर्गे ,समन्वयीका सौ.विजयालक्ष्मी परांजपे,शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन देशपांडे,उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप, पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे,पर्यवेक्षिका सौ. रमा तारे ,गुणवंत विद्यार्थी,पालक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळेस प्रमुख अतिथी यांच्याहस्ते विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन देशपांडे यांनी प्रास्ताविकातून वर्षभरात शाळेने केलेल्या विविध शैक्षणिक कार्याचा आढावा सादर केला.या वेळेस उपस्थित प्रमुख अतिथींचा यथोचित सत्कार झाल्यानंतर इ 6 वी मधील विद्यार्थ्यानी ज्ञानगीत सादर केले त्यास तबल्यावर साथ संगीत शिक्षिका श्रीमती संपदा तुंबडे व ढोलकी वर साथ श्री उल्हास ठाकरे यांनी दिली.या वेळेस प्रमुख अतिथींचा यथोचित सत्कार झाल्यानंतर शालेय वर्षात विविध वर्गांमध्ये गुणवत्ता संपादन केलेल्या 65 विद्यार्थांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान प्रमुख अतिथींच्या हस्ते गुलाबपुष्प ,भेटवस्तू,रोख पारितोषिक देऊन करण्यात आला.या वेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.श्री.सुशील दादा अत्रे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करून विद्यार्थांनी केवळ अधिक गुण प्राप्त करण्याच्या मागे न लागता शालेय शिस्त, चांगूलपणा,प्रामाणिकपणा , शिस्तबद्ध वर्तन अंगिकारून जीवनात चांगला नागरिक होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोमनाथ महाजन यांनी तर आभारप्रदर्शन सौ.स्वाती एडके यांनी तर पारितोषिक देणगीदार सूचीचे वाचन सौ.रेवती किन्हीकर यांनी व पारितोषिक प्राप्त विद्यार्थी यादीचे वाचन सौ स्मिता करे यांनी केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी देणगीदार तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page