भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात व मोठ्या प्रतिसादात संपन्न

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

अमळनेर शहरात क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात व मोठ्या प्रतिसादात संपन्न झाली. या स्पर्धेत शहरासह परिसरातील अनेक धावपटूंनी सहभाग नोंदवून सामाजिक ऐक्य व आरोग्याचा संदेश दिला.

 

स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर तालुक्याचे लोकप्रिय भूमिपुत्र आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यांच्या सोबत अमळनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम,PSI काकडे, पोलिस कॉन्स्टेबल, विनोद सदनशिव ,सिद्धार्थ शिसोदे, किरण पाटील पत्रकार व इतर मान्यवर उपथिस्त होते. सकाळच्या उत्साही वातावरणात सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये युवक, युवती तसेच विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

 

पुरुष गटात तेसज सपकाळे (नाशिक) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. ऋषिकेश वारुडे (नाशिक) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर खुमानसिंग ठाकरे नंदुरबार जिल्ह्यातील, धडगाव येथील तृतीय क्रमांक मिळवून आपली छाप पाडली. विजेत्यांना अनुक्रमे ७००० रुपये, ५००० रुपये व ३००० रुपये रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

 

महिला गटातही स्पर्धकांनी उल्लेखनीय कामगिरी केली. उन्नती पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर आरती पाटील यांनी द्वितीय आणि ज्योती महाजन यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना अनुक्रमे ५००० रुपये, ३००० रुपये व २००० रुपये रोख बक्षीस देण्यात आले.

 

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती महोत्सव समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद अमळनेर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष तसेच जयंती महोत्सवाचे पदाधिकारी नरेंद्र रामभाऊ संदानशिव, अविनाश संदानशिव,गौतम मोरे, देवदत्त संदानशिव,सुनील वाघ,सुनील करंदीकर ,गोपीचंद चव्हाण, राहुल संदानशिव, श्रीचंद चव्हाण,सतीश सोनवणे, ज्ञानेश्वर संदानशिव , गोकुळ बिऱ्हाडे,प्रा.कृष्णा संदानशिव, नितीन संदानशिव, स्वप्नील पाटील ,भिका संदानशिव संदानशिव, राजेंद्र संदानशिव , समाधान बिऱ्हाडे, सिद्धार्थ मोरे, दिनेश संदानशिव,जितेश संदानशिव, तुषार संदानशिव,परम चव्हाण, शुभम घोलप,अभिषेक संदानशिव, प्रेम बैसाने, सागर बिऱ्हाडे,सुमेध मोहिते, दीपक सोनवणे, विजय संदानशिव, गणेश ब्रह्मे, काशिनाथ संदानशिव संदीप सदानशिव, संदीप वाघ, राजरत्न सोनवणे, नाना पाटील, सहभागी, विद्यार्थ्यांचे ,सहभागींचे व इतर नागरिकांचे आभार मानले.

महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रप्रभा नेतकर, नीलिमा जाधव, अनिता जाधव, किरण चव्हाण, वर्षा चव्हाण, सुनंदा संदानशिव, दिपाली संदानशिव, सोनल पवार, नितल चव्हाण, गौतमी चव्हाण इतर उपस्थित होते.

 

ही मॅरेथॉन स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम न राहता सामाजिक एकात्मता, प्रेरणा आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्याचे प्रभावी माध्यम ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page