अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क 
साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे, ता. अमळनेर येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव, समानता आणि न्यायाचे महान प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष डी एम पाटील यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले कार्यक्रमाला अनिल पाटील, युवराज पाटील, नामदेव पाटील, मुरलीधर पाटील, पितांबर पाटील, अशोक वाल्हे, सुनील पाटील, राहुल पाटील, अशोक पाटील, देविदास पाटील, व वाचक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल विजय पाटील यांनी केले.




